प्रतिनिधी – राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2021-22 अंतर्गत बऱ्हाणपूर येथे कृषी विभागामार्फत रब्बी ज्वारी बियाणे वाटप व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम पार पडला. यावेळी 50 शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना माती परीक्षणासाठी माती नमुना कसा घ्यायचा याविषयी मार्गदर्शन केले. व माती नमुने लवकरात लवकर जमा करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले. त्याच बरोबर बियाण्यास अझेटोबॅक्टर व पीएसबी ची बीज प्रक्रिया करून दाखविण्यात आली. 20 हेक्‍टर क्षेत्रावर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. बीज प्रक्रिया करून व पेरणी यंत्राद्वारे पेरणी करण्याच्या सूचना मंडळ कृषी अधिकारी उंडवडी सुपे श्री यमगर यांनी दिले आहेत. कृषी सहाय्यक श्रीमती आडके यांनी बियाणे वाटप केले व यावेळी शेतकरी गटातील सर्व शेतकरी व परिसरातील शेतकरी बंधू उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *