सोमेश्वर नगर: वानेवाडी येथील ज्युदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्ट असोसिएशन या संस्थेच्या वतीने वानेवाडी(ता बारामती) येथे नुकत्याच कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये यलो बेल्ट स्पर्धेत शिवराज बांदल व सायली गौडगाय या स्पर्धकांनी अजिंक्यपद पटकावले. ही स्पर्धा वानेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रागणात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वानेवाडी, मुरुम, सोमेश्वरनगर,करंजेपुल, दहा फाटा येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे ब्लॅक बेल्ट मास्टर मोनिका गाढवे यांच्या हस्ते झाले. यावेळी धनंजय भोसले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ कारंडे, बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रम भोसले उपस्थित होते.

येलो बेल्ट मुले
शिवराज बांदल, कृष्णा कात्रजकर, अथर्व कर्चे, श्वेत पाटील, अजिंक्य कापरे ,श्रीनाथ घाडगे, ओम कर्चे जीवन भोसले.

येलो बेल्ट मुली
सायली गौडगाय, सानवी भोसले, श्रावणी खांडेकर, संचिता जगताप

ऑरेंज बेल्ट
यशस्वी भोसले, स्वानंदी जाधव

ब्ल्यू बेल्ट
कार्तिकी पवार, मयुरेश भोसले

ब्राऊन बेल्ट फर्स्ट
ओजस निगडे

ब्राऊन बेल्ट थर्ड
वैष्णवी जाधव, जयदीप जाधव
या मुलांनी यश संपादन केले.
या स्पर्धेचे आयोजन संस्थेचे ग्रँडमास्टर प्रकाश रासकर यांनी केले होते व ब्लॅक बेल्ट मास्टर चंद्रकांत सोनवणे, शुभम कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *