प्रतिनिधी :- आज दि. २७ सप्टेंबर २०२१ रोजी श्री. संत गाडगेबाबा महाराज अकुल धर्मशाळा, सोमवार पेठ,पुणे येथे महाराष्ट्र राज्य धोबी(परीट) समाज महासंघ (सर्व भाषिक) ची मिटिंग झाली. यामध्ये राजेगाव ता.दौंड निवासी महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार व उत्कृष्ट सेंद्रिय शेतकरी पुरस्कार विजेते राजेगाव, ता. दौंड येथील समाजसेवक मा. श्री.राजेंद्र कदम यांची महाराष्ट्र राज्य धोबी(परीट) समाज महासंघ (सर्व भाषिक) च्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली. संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष श्री. कुमार ( भाऊ) शिंदे आणि पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. राजन लोणकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य धोबी(परीट) समाज महासंघ (सर्व भाषिक) चे युवा प्रदेशाध्यक्ष सचिन कदम, लॉंड्री प्रदेशाध्यक्ष सुनिल पवार, महिला प्रदेशाध्यक्षा अरुणा रायपुरे, संघटनेचे मार्गदर्शक सुनिल शिंदे, महाराष्ट्र धोबी परीट समाज आरक्षण समन्वय समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख तसेच धोबी महासंघाचे पुणे जिल्हा महासचिव संदिप आढाव, पुणे शहर महिला अध्यक्षा वैशाली सोनटक्के, महिला पुणे शहर सचिव अंजली खंडाळे, शहर कार्यकारणी सदस्या सरस्वती खंडाळे, शहर कार्यकारणी सदस्य राजाभाऊ कदम इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *