प्रतिनिधी ( इंद्रभान लव्हे) :- झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या गोरगरिबांना लवकरात लवकर सातबारा उताऱ्यावर आणणार असल्याचे प्रतिपादन लोकनेते भगवानराव वैराट यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्य पदी निवड झाल्याबद्दल माळेगाव येथील नागतळे झोपडपट्टीवासीयांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक तानाजीराव पाथरकर, पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष सुरेखा भालेराव, पुणे शहर सरचिटणीस सुनिल भिसे, संपादक पत्रकार सुरक्षा दलाचे अध्यक्ष योगेश नालंदे, पत्रकार संदीप आढाव, इंद्रभान लव्हे, सौरभ गडकर इत्यादी मान्यवर हजर होते.
यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले की, झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून आजवर महाराष्ट्रातील अनेक झोपडपट्टीधारकांना आपण न्याय मिळवून दिलेला आहे. त्यामध्ये झोपडपट्टीमधील रहिवाशांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, त्यांना नमुना क्रमांक 8/अ वर आनणे, झोपडपट्टीमधील महिला सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगारासाठी कर्जाची सोय उपलब्ध करणे, शैक्षणिक मदत करणे, आरोग्याच्या सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी कामे संघटनेच्या माध्यमातून करत आहे. कोरोनाच्या काळामध्ये देखील अनेक गरजू झोपडपट्टीमधील रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला. झोपडपट्टी सुरक्षा दल ही संघटना सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब घटकाला न्याय मिळवून देणे हे प्रमुख कर्तव्य आहे, त्यामुळे झोपडपट्टीमधील राहणाऱ्या सर्व सभासदांनी संघटनेची एकनिष्ठ राहिल्यास सर्व प्रश्न सोडवण्यासाठी संघटना कायम तत्पर असेल.
प्रशासनामधील बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी गरीब कष्टकरी झोपडपट्टी धारकांच्या झोपडीला विनाकारण त्रास दिल्यास झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून तीव्र लढा उभा केला जाईल, असे देखील भगवानराव वैराट यावेळी म्हणाले. हा कार्यक्रम बारामती तालुका अध्यक्ष उमेश भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली, हर्षद पवार दलित विकास आघाडीचे बारामती तालुका अध्यक्ष दत्ता बाबर, राजेंद्र पांडुळे, वाल्मीक कुचेकर, सतीश माने, अजय माने, तानाजी दोडके, विजय कदम, बबलू गरुड इत्यादी कार्यकर्त्यांनी माळेगाव येथील नागतळे झोपडपट्टी याठिकाणी आयोजित केला होता. यावेळी पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा कोषाध्यक्षपदी संदीप आढाव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने यावेळी लोकनेते भगवानराव वैराट साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *