प्रतिनिधी : महाराष्ट्र पोलीस खात्यातील पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी व पोलीस दलातील महीला अधिकारी कर्मचारी वर्ग अतिशय कर्तव्यदक्ष प्रामाणिकपणे आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता कर्तव्य बजावत असतात, त्यांना कुटूंबासोबत कुठलाही सण किंवा इतर सुखाचा वेळ देऊ शकत नाहीत, कारण त्यांना 24तास जनसेवेसाठी सज्ज राहावे लागते, पोलीस दलातील अधिकांऱ्यापासुन ते कर्मचाऱ्यांपर्यंत कर्तव्यनिष्ठ असतात, यासह कर्तव्यदक्ष भूमिकाही बजावत असतात. मी सामाजिक कार्यकर्ता असल्याने अनेकवेळा पोलीस बांधवासोबत संपर्क आला आहे, माझ्या मनामध्ये पोलीस वर्गाबाबत आदर आहे,पोलीसांनी जनतेला राञ-दिवस तत्पर सेवा मिळावी म्हणून त्यांनी अनेक पथकेही स्थापन केली आहेत उदा:महीलांसाठी दामिनी, जेष्ठ नागरिकांसाठी, लहान मुलांसाठी,वाहतुकीसाठी सतर्क अश्या विविध अनेक जनतेच्या सेवेसाठी सुविधा चालु केले आहेत, पोलीस बांधव 24 तास इतके प्रामाणिकपणे काम करीत असताना सुध्दा समाजातील काही लोक पोलिसांकडे अतिशय संशयी नजरेने पाहत असतात,समाजातील अश्या लोकांनी पोलीसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहीजे, अतितानामुळे पोलिसांचे मानसिक आरोग्य-बिघडत असते, त्यांना कुटुंबीयांना जास्त वेळ देता येत नाही.त्यामुळे पोलीसांची ड्युटी आठ तासांची असावी म्हणजे ते आपल्या कुटूंबाला वेळे देतील आणि त्यांचे कुटुंबीय आनंदी राहील.यासह वाहतुक पोलीस चौकीत किंवा शहरातील विविध ठिकाणी वाहतुक कंट्रोल करण्यासाठी दिवसभर उभे असतात, तर त्यांना त्याठिकाणी बसण्यासाठी खुर्ची आणि पिण्यासाठी पाण्याची सोय असावी. आज पोलीसांमुळे जनता सुरक्षित आणि सुखरूप आहे, पण पोलीसच असुरक्षित आहेत.त्यामुळे पोलीसांची ड्युटी आठ तासांची असावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते- गजानन भगत फलटण कर यांनी प्रसिध्दीपञकातुन केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंञी आणि गृहमंञी यांना पोलीसांच्या प्रश्नांविषयी संविधानीक निवेदन देणार असल्याचेही गजानन भगत फलटण कर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *