प्रतिनिधी, भिगवण:- डॉ.अभिनव देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी गणेश उत्सवाचे अनुशंगाने सतर्क पेट्रोलींग करणे व रेकॉर्डवरील गुन्हेगार हदपार करणे अशा प्रकाराच्या सुचना दिल्या होत्या. त्याअनुशंगाने आज दिनांक. १९/०९/२०२१ रोजी गोपनिय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीतीनुसार, मौजे भिगवण गावचे हदीत जुना भिगवण राशिन रोडने राशिन बाजुकडुन एका मोटार सायकल वरून दोन इसम बेकायदेशीर गांजा घेवुन जाणार आहेत अशी बातमी मिळाल्याने, भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मा. दिलीप पवार, सहा.पोलीस निरीक्षक, विनायक दडस पाटील, पोलीस उपनिरीक्षक यांनी तात्काळ मदतीस पोलीस स्टाफ घेवुन दुपारी २:४० वा चे सुमारास मौजे भिगवण गावचे हदीत जुना भिगवण राशिन रोड याठिकाणी सापळा रचुन एका मोटार सायकलवर दोन इसम पांढऱ्या गोणीमध्ये काहीतरी घेवुन येताना दिसले. मोटार सायकल स्वार यांना पोलीसांनी थांबविण्याचा इशारा केला असता त्यातील एक इसम पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला. पोलीसांनी शिताफीने त्याचा दुसऱ्या साथीदार नामे अशोक शिवदास पवार, वय.२१वर्ष रा.वांगी, ता. भुम, जि. उस्मानाबाद यास मुदमालासह ताब्यात घेतले. त्याचे ताब्यातुन १६ किलो वजनाचे गांजा सह एक होंडा शाईन मोटार सायकल असा एकुण ३,०६,०००/- रूपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा रजि.नंबर.२२९/ २०२१. गुंगीकारक औषधी द्रव्य मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम.८(क), २०(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी ही मा. डॉ.अभिनव देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.मिलींद मोहीते सो, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. नारायण शिरगावकर सो, उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मा.दिलीप पवार सो, सहा.पोलीस निरीक्षक, मा. विनायक दडस पाटील, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार साईराम भिसे, नवनाथ भागवत, सचिन पवार, महेश उगले, केशव चौधर, आप्पा
भांडवलकर, होमगार्ड धुमाळ, सुर्यवंशी यांनी केली
आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *